esakal | Akola: राष्ट्रीय महामार्गावर बस लुटणारा पोलिस कर्मचारी बडतर्फ
sakal

बोलून बातमी शोधा

crime

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर बस लुटणारा पोलिस कर्मचारी बडतर्फ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर लक्झरी बसमध्ये ५० लाखांची लुटमार करणाऱ्या चार आरोपींमध्ये सहभागी असलेल्या रामा उर्फ रामविलास पवार या पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस विभागातून बडतर्फ करण्याचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.

अकोला येथून मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या लक्झरी बसमधील एका व्यापाऱ्याचे ५० लाखांची रोकड रिधोरा परीसरात असलेल्या एका ढाब्याच्या परीसरात चौघांनी अडवून लुटली होती. स्थानिक गुन्हे शाखेने काही तासात तपास करून चार आरोपीच्या मुकस्का आवळल्या होत्या. या चार आरोपीपैकी एक पोलिस कर्मचारी रामा उर्फ रामविलास पवार हाही होता.

लुटमारीत पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याने पोलिस विभागाच्या प्रतिमेवरच डाग लागले. वर्दीतील या गुंडांमुळे विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याने पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तातडीने कारवाई करीत रामा पवारला पोलिस विभागातून बडतर्फ करण्याचा आदेश काढला आहे.

पूर्व इतिहासही वादग्रस्त

रामा उर्फ रामविलास पवार या पोलिस कर्मचाऱ्याचा पूर्व इतिहासही वादग्रस्त राहिला आहे. ज्या पोलिस स्टेशनमध्ये हा कर्मचारी कार्यरत होता, तेथे अवैध मार्गाने माया जमविल्याची चर्चा पोलिस विभागात आहे. काही महिन्यांपूर्वीच एका वादग्रस्त प्रकरणात नाव आल्याने त्याची अकोला पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली होती.

loading image
go to top