

Akola
esakal
अकोला: आगामी धार्मिक सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अंतर्गत जुने शहर आणि सिव्हील लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांतील पाच जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.