
अकोला : शहरातील खदान पो.स्टे. हद्दीमधील इनकम टॅक्स चौकातील न्यु शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्रीच्या दुकानातून १.१५ कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले. खदान पो.स्टे.चे पोलिस निरिक्षक मनोज केदारे यांना माहिती मिळाली की, भारतीय चलनामधील नगदी रोख रक्कम अवैधरित्या इन्कम टॅक चौक अकोला येथील न्यु शर्मा ब्रदर्स सायकल विक्रीच्या दुकानात आली आहे.