अकोला : ऑटोमधून पोलिसांनी ३०० किलो गोमांस जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जप्त

अकोला : ऑटोमधून पोलिसांनी ३०० किलो गोमांस जप्त

अकोला : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी शहरातील सरकारी बगीचा समोरून जाणाऱ्या तीन ऑटोंना अडवले. यावेळी सदर ऑटोमधून पोलिसांनी ३०० किलो गोमांस जप्त केले. त्यासोबतच पाच आरोपींना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत पाच लाख १० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मंगळवारी (ता. ६) पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली की खदानकडून लक्झरी बस स्टॅन्ड मार्गे सिटी कोतवालीकडे तीन ऑटोमध्ये अवैधरित्या गोमांस भरून जात आहे. त्यामुळे पोलिसांनी सरकारी बगीचा समोर नाकाबंदी केली व अनिकट चौकाकडून एका मागे एक तीन ऑटो येताना पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी ऑटो क्र. एमएच-३०-बीसी-२९४८, एमएच-३०-एए-६३७४ व एमएच-३०-बीसी-१७९३ ला थांबवले. यावेळी सदर ऑटोची पोलिसांची झडती घेतली असता त्यामध्ये ३०० किलो गोमांस आढळून आले.

त्यामुळे पोलिसांनी ऑटो चालक शे. यूनुस शे. मोहम्मद (वय ३८, रा. महेमूद नगर अकोट फाईल), इम्रान अहमद शे. हयात (वय २४, रा. खिडकीपुरा), मो. सुफियान अ. सलीम (वय ३२), मो. रुमान अ. सलीम (वय २२, दोन्ही राहणार खिडकीपुरा), मो. इम्रान मो. रफीक (वय २६, रा. कच्छी मजिद जवळ मोहम्मद अली रोड) यांना अटक केली. त्यासोबतच ६० हजार रुपये किंमतचे ३०० किलो गोमांस, तीन ऑटो किंमत ४ लाख ५० हजार रुपये असा एकूण पाच लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Akola Police Seized 300 Kg Beef From An Auto

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..