Akola Police : युवकाच्या हत्येप्रकरणी आरोपींचा १२ तासांत शोध; जेतवन नगरात झाली होती हत्याः खदान पोलिसांची कारवाई
Crime Investigation : अकोल्यातील जेतवन नगरात एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. खदान पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींचा शोध घेत कारवाई केली.
अकोला : खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणारे जेतवन नगर येथे आज भर दिवसा भर रस्त्यावर एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात खदान पोलिसांनी तब्बल १२ तासात आरोपींचा शोध लावण्यात यश मिळवले.