esakal | बापरे,  भाजपच्या आमदारांना पाच कोटींची खंडणी, अन्यथा मुलासह परिवाराला गोळ्या घालू

बोलून बातमी शोधा

Akola Political News BJP MLA Prakash Bharasakle from Akot Assembly constituency demands Rs 5 crore ransom}

अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना पाच कोटींच्या खंडणीची मागणी पाकीटबंद पत्राद्वारे करण्यात आली. ही रक्कम न दिल्यास त्यांच्यासह मुलगा व कुटुंबीयांना संपविण्याची धमकी या कथित खंडणीखोरांनी दिली आहे. 

बापरे,  भाजपच्या आमदारांना पाच कोटींची खंडणी, अन्यथा मुलासह परिवाराला गोळ्या घालू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना पाच कोटींच्या खंडणीची मागणी पाकीटबंद पत्राद्वारे करण्यात आली. ही रक्कम न दिल्यास त्यांच्यासह मुलगा व कुटुंबीयांना संपविण्याची धमकी या कथित खंडणीखोरांनी दिली आहे. 
विशेष म्हणजे, हे पत्र सात दिवसांपूर्वी मिळाले असून लेखनाची भाषा शैली हिंदी भाषेतील बिहारी बोलीमधील आहे.  प्रकाश भारसाकळे यांच्या  र्यापूर येथील निवासस्थानी हे पत्र आल्याची तक्रार दर्यापूर पोलीस स्टेशनला करण्यात आली या लेटर बॉम्बने दर्यापूर व आकोट परिसरात खळबळ उडाली आहे.

अकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आहेत. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष, मुलगा विजय भारसाकळे हे जिनिंग-प्रेसिंगचे संचालक आहेत.  खंडणीची मागणी करणारे पत्र शिवाजी नगर स्थित निवासस्थानी 20 फेब्रुवारी रोजी टपालाने प्राप्त झाले त्याबाबत आमदार भारसाकडे यांना कळविण्यात आल्यानंतर स्वीय सहाय्यक सुधाकर हातेकर यांनी 21 फेब्रुवारी रोजी दर्यापूर पोलिसात तक्रार नोंदविली भारसाकळे कुटुंबाला सुरक्षा पुरविण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

आमदार अधिवेशनात
सोमवारपासून सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आमदार प्रकाश भारसाकळे 28 फेब्रुवारी रोजी मुंबईला रवाना झाले ते या घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत.

अन्यथा कुटुंबाला गोळ्या घालू
आमदारांसह त्यांच्या कुटुंबाला गोळ्या घालून व अपघात घालून संपविण्याची भाषा करणारे पत्र हे हिंदी भाषेत आहे पोलिसांना किंवा अन्य कुणाला याबाबत माहिती दिल्यास नुकसान भोगावे लागेल असा उल्लेख आहे या पत्रात 28 फेब्रुवारी पर्यंत पाच कोटीची खंडणी म्हणून व्यवस्था करून ठेवण्याची धमकी दिली आहे

बिहार येथील चाळीस लोकांची टोळी 
आमदार भारसाकडे यांना खंडणीची मागणी करणाऱ्या पत्रात हे पत्र पाठवणारे 40 लोक असल्याचे नमूद आहे. खंडणीची रक्कम दर्यापूर येथे फेब्रुवारी 28 फेब्रुवारीला मिळायला हवी. त्यानंतर आणि बिहारला निघून जाऊ आमच्या पैकी एकही पकडले गेल्यास नुकसान भोगावे लागेल, असे या पत्रात नमूद आहे चौकशीसाठी हे पत्र दर्यापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंग