जिल्हा बँकेच्या नऊ संचालकपदासाठी आज मतदान

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 20 February 2021

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नऊ संचालकपदासाठी शनिवारी मतदान हाेणार आहे. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने मतदानासाठी मतदारांना विनवणी करण्याची करसत संबंधितांना करावी लागणार आहे.

अकाेला  ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नऊ संचालकपदासाठी शनिवारी मतदान हाेणार आहे. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने मतदानासाठी मतदारांना विनवणी करण्याची करसत संबंधितांना करावी लागणार आहे.

अकाेला व वाशीम जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीत बिनविराेध नामांकन असलेल्या उमेदवारांची संख्या १२ आहे. यात सेवा सहकारी संध्या मतदारसंघ, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ भटक्या जाती-विमुक्त व विशेष मागासवर्गीय मतदारसंघ, कृषी पणन, शेतीमाल प्रक्रियेतून शिरीष धाेत्रे, औद्याेगिक, मजूर, विणकर, वैयक्तिक भागधारक मतदारसंघांचा समावेश आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात १८ उमेदवार कायम असून, यात प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवडा-सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी सहा तालुक्यातून १३ उमेदवार महिला प्रतिनिधी मतदारसंघातून तीन उमेदवार आणि यांचा समावेश आहे. पगादार व इतर सभासद मतदारसंघातून दाेन उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Political News Voting for the nine posts of District Bank today