मूर्तिजापूर येथे गरोदर महिला पॉझिटिव्ह; चौघे क्वारंटाईन

प्रा.अविनाश बेलाडकर 
Thursday, 9 July 2020

तालुक्‍यातील धोत्रा शिंदे येथील एक गरोदर महिला कोरोनाबाधीत आढळली आले. त्यामुळे तिला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, तर दोन दिवसांपूर्वी दाखल रूग्ण निगेटिव्ह आढळल्याने त्याला सुटी होईल.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : तालुक्‍यातील धोत्रा शिंदे येथील एक गरोदर महिला कोरोनाबाधीत आढळली आले. त्यामुळे तिला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, तर दोन दिवसांपूर्वी दाखल रूग्ण निगेटिव्ह आढळल्याने त्याला सुटी होईल.

मुंबईत राहून एसटी महामंडळाच्या सेवेत असणारा हातगाव येथील एक जण आपल्या गावी परतल्यानंतर थेट रूग्णालयात हजर झाला होता. येथे परतण्यापूर्वी त्याने मुंबईत आपला स्वॅब नमुना दिला होता. मुंबईत वैद्यकीय सूत्रांशी संपर्क न होऊ शकल्याने येथील रूग्णालय प्रशासनाने त्याचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविला होता. तो अहवाल निगेटीव्ह आला आहे. दरम्यान गुरुवारी (ता. 9) धोत्रा शिंदे येथील महिलेच्या संपर्कातील चार जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे यांनी दिली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

धोत्रा शिंदे येथील एक गरोदर महिला पॉझिटिव्ह आलेली असून त्याअनुषंगाने तिच्या संपर्कात आलेल्या चार हायरिस्क संपर्कातील लोकांना शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतीगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकृत करून ठेवण्यात आले आहे. उर्वरित कंटेनमेंट झोनचे सर्वेक्षण व इतर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
- अभयसिंह मोहिते,उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर

 

(संपादन -  विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Pregnant women positive at Murtijapur; Fourteen quarantine