esakal | अकोला कारागृहाला कोरोनाने घेरले
sakal

बोलून बातमी शोधा

c0481846-wuhan_novel_coronavirus_illustration-spl.jpg

आधी 18 आता तब्बल 50 कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह ः कैद्यांचाही जीव टांगणीला

अकोला कारागृहाला कोरोनाने घेरले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः अकोल्यात कोरोना रुग्णांचा संख्या झपाट्याने वाढत आहे. आणि अशातच आता जीवघेण्या कोरोनाने कारागृहालाही घेरले आहे. काही दिवसांपूर्वीच 18 कैद्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यात पुन्हा 50 कैद्यांची भर पडली आहे. आता कारागृहातील एकुण कैद्यांपैकी तब्बल 68 कैदी कोरोना बाधित झाले आहेत. 

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 78 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील 50 पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित 28 जणांमध्ये 11 महिला व 17 पुरुष आहेत. पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड (ता.अकोट) येथील सहा जण,  राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, बार्शीटाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.

दोन जणांचा मृत्यू
दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक अशोकनगर येथील 62 वर्षीय पुरुष असून, हा रुग्ण 26 जून रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील 55 वर्षीय पुरुष असून, तो 14 जून रोजी दाखल झाला होता त्याचा काल रात्री मृत्यू झाला.
 
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- 1498
मयत-76 (75+1)
 डिस्चार्ज-1047
दाखल रुग्ण -378

loading image