

Akola
esakal
अकोला: जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम संकटाच्या उंबरठ्यावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १८२ मिमी पाऊस झाला असून, तो हंगामी सरासरीच्या ६६.५ टक्के इतकाच आहे. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने जमिनीतील ओल झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्याने पेरलेल्या बियाण्यांच्या उगवणीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पेरण्या उलटण्याबरोबरच दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.