Akola News: एप्रिलमध्ये मिळणार तिप्पट धान्य; रेशनच्या लाभार्थ्यांना दिलासा; एप्रिल, मे, जूनच्या धान्याचे एकाच वेळी वाटप

April, May, June Grain to be Supplied at Once: अकोला जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांसाठी दिलासा; एप्रिल महिन्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना तिप्पट धान्य मिळणार.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: रेशन कार्डधारकांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगामी एप्रिल महिन्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच तिप्पट धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गटातील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून महिन्यातील धान्याचे वाटप एप्रिल महिन्यातच करण्यात येणार आहे. परिणामी लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्यांसाठी धान्यासाठी रास्तभाव दुकानाच्या पायऱ्या झिजवायची वेळ येणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com