बेरंग झाला श्रावण, कोरोनामुळे श्रावणात खुणावणारी पर्यटनस्थळे पडली ओस; पर्यटकांचा हिरमोड, व्यावसायिक अडचणीत

Akola Risod became colorless Shravan, Corona fell in Shravan marked tourist dew; Hiramod of tourists, in commercial difficulty
Akola Risod became colorless Shravan, Corona fell in Shravan marked tourist dew; Hiramod of tourists, in commercial difficulty

रिसोड  ः मॉन्सूनपासून पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. मात्र कोरोनामुळे सर्वत्र प्रेक्षणिय तसेच धार्मिक स्थळे बंद असल्याने ही स्थळे ओस पडलेली दिसत आहेत. श्रावणमास असूनही पर्यटन बंद असल्याने निसर्गप्रेमींचा हिरमोड झाला आहे तर, दुसरीकडे ऐन हंगामात पर्यटनाचे अर्थचक्र रुतल्याने व्यवसायाला मोठ्या आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत.


पहिला पाऊस पडला की निसर्गप्रेमींची पावले पर्यटनस्थळांचा वेध घेतात. हिरवा निसर्ग पर्यटकांना खुणाऊ लागतो. देशविदेशातील पर्यटनाचे बेत आखले जातात. मात्र, यंदा सर्वच नियोजनावर पाणी फेरले आहे. कोरोनामुळे शासनाने खबरदारी म्हणून पर्यटनस्थळांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा पर्यटनाचे बेत रद्द करून घरातच बसण्याची वेळ हौशींवर आली आहे. हा लाॅकडाउनचा कालावधी कधी सुटेल या आशेवर पर्यटक आहेत तर, दुसरीकडे पर्यटन हंगामाची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवरही लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मागील काही दिवसांपासून श्रावणमासाला प्रारंभ झाला आहे. श्रावण म्हंटला की सगळीकडे आल्हाददायक वातावरणनिर्मिती झालेली असते. रंगबिरंगी फुले-पाने-पक्षी पर्यटकांना खुणावत असतात. यात धार्मिक स्थळांवर भेटी देणाऱ्यांची मोठी गर्दी असते. ट्रॅव्हल्स, हॉटेलिंग, गाईड आदी व्यवसायिकांना या हंगामाची आतुरतेने प्रतीक्षा असते. परंतु लॉकडाउनमुळे संबंधित व्यावसायिक अडचणीत आले असून, श्रावणाचा बेरंग झाल्याचे चित्र राज्यात आहे.
- सतीश मांदळे, पर्यटन प्रेमी, रिसोड


‘ट्रॅव्हल्सची चाके रुतली’
छोट्या ते मोठ्या ट्रिपसाठी चारचाकी गाड्यांची बुकींग, या दिवसात जोरात असते. साधारणत: एका दिवस ते आठवडापर्यंतच्या या ट्रिप असतात. यातून चारचाकी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना चांगली कमाई होते. परंतु सध्या सर्वच बंद असल्याने ट्रॅव्हल्स उद्योग लोकडाउन उठण्याच्या प्रतीक्षेत आहे.
- सुभाष निगोत, ट्रॅव्हल्स मालक

हॉटेल्सची दारेही बंदच
या हंगामात पर्यटन व धार्मिक स्थळांवर जाऊन राहणाऱ्यांची संख्याही जास्त असते. मात्र, शासनाने हॉटेल्सला अद्याप परवानगी दिलेली नसल्याने हॉटेलिंग व्यवसाय डबघाईस आलेला आहे. या व्यवसायावर अवलंबून शेफ, आचारी, बुकींग, वेटर, हाऊस किपिंग सर्वांवरच उपासमारीची वेळ आली आहे.
- भानुदास कोकाटे, हाॅटेल चालक
(संपादन-विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com