शारीरिक सुख पाहिजे म्हणत एसटीच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने कर्मचारी महिलेसोबत...

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 27 June 2020

एसटी महामंडळातील एका वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांने एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला असल्याची तक्रार खदान पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अकोला ः एसटी महामंडळातील एका वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांने एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला असल्याची तक्रार खदान पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी वर्कशॉक कौलखेड येथील आरोपी अतुल पोजगे (ऑपरेटर सेक्शनमधील सहाय्यक) शारीरिक छळ करतात आणि अश्‍लील चाळे करतात, शारीरिक सुख पाहीजे, असे जर केले नाही तर सेक्शनमधून काढून टाकेल अशी धमकी देतात अशा आशयाची तक्रार एका महिला कर्मचाऱ्यांनी खदान पोलिस ठाण्यात दिली आहे.

हा प्रकार २ ते २० जून दरम्यान घडत होता. याप्रकरणी २४ जून रोजी कर्मचारी महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसानी आरोपीविरुद्ध भादवि कलम ३५४, ३५४ अ, नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Saying that he wants physical pleasure, a senior officer of ST with a female employee ...

Tags
टॉपिकस
Topic Tags: