बाळापूर (अकोला) - अनेक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवीले.. आंदोलने झाली... मोर्चे काढून झाले.. मात्र शेगाव दिंडी रस्त्याची दुरुस्ती प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे शेगाव दिंडी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारकरी श्रींच्या कडेच साकडे घालणार आहे. .दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिना निमित्ताने हजारोंच्या संख्येने वारकरी शेगाव येथे जाण्यासाठी पायी रवाना होतात. अकोला - शेगाव मार्गावरुन पालखीसोबत हजारोंच्या संख्येने वारकरी असतात. शेगावला जाण्यासाठी अकोला गायगाव, निमकर्दा हाच एकमेव दिंडी मार्ग आहे. मात्र हा मार्ग अत्यंत खडतर असून याही वर्षी या खडतर मार्गावरुनच वारकऱ्यांना प्रवास करावा लागणार आहे..श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रामहोत्सवात सहभागी होण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रींची पालखी २ जून रोजी सकाळी ७ वाजता मंदिरातून पायदळ वारी करत पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. पालखी वारीचे हे ५६ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी प्रस्थान करणार आहेत. मात्र ही वाट यंदाही वारकऱ्यांसाठी खडतरच असणार आहे..अकोला ते शेगाव पालखी मार्ग खड्ड्यांनी व्यापलेला आहे. पालखी मार्ग दुरुस्त करावा, अशी अनेकदा विनवणी करूनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. आंदोलने, उपोषण, रास्तारोखो अशा विविध मार्गांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली, परंतु प्रशासनाचे मात्र डोळे उघडले नाहीत.निमकर्दा, गायगाव मार्गे जाणाऱ्या शेगाव मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. शिवाय या रस्त्याचे चौपदरीकरण होत असल्याने काम सुरू आहे. मात्र हे काम अनेक दिवसांपासून अपुर्ण आहे. संत गजानन माऊलींची पालखी २ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे..माऊलींची पालखी २ जून रोजी होणार दाखल२ जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थांमध्ये महाप्रसादानंतर दुपारी बाळापूर तालुक्यातील कसुरा येथे श्रींची पालखी दाखल होणार आहे. सायंकाळी पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा पहिला मुक्काम राहील.३ जून रोजी पारस येथून गायगाव येथे तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे ४ व ५ जून असे दोन दिवस मुक्काम राहील. दरम्यान कसुरा, पारस, निमकर्दा, गायगाव रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने हा मार्ग वारकऱ्यांसाठी अत्यंत दैना देणारा ठरणार आहे..अवकाळी पावसामुळे दिंडी मार्ग जलमयसर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या कसुरा ते गायगाव पर्यंतच्या मार्गावर सध्या खड्डेच खड्डे पडले आहेत. निमकर्दा, पारस, गायगाव रस्त्याची भीषण स्थिती आहे. शेगाव दिंडी मार्गावर पहिल्याच पावसाने दाणादाण उडवून दिली असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.चिखल आणि पाणी रस्त्यावर झाल्याने वारकऱ्यांना नरक यातना सहन कराव्या लागणार आहेत. चिखलाने बरबटलेल्या रस्त्यांचा सामना श्रींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना करावा लागणार आहे. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची वाट लागली असल्याचा आरोप होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.