बापरे! एक किलो सोने, तीन जिवंत काडतुसं अन् भलं मोठं अवैध साहित्य सापडलं या पठ्ठ्याच्या घरात

गजानन काळुसे
Saturday, 8 August 2020

सिंदखेड राजा शहरांतील कैलास पवार वास्तवास होता, त्यांने स्वतःच्या घरी देशी जिवंत काडतुससह अनेक अवैध साहित्यांची जमवाजमव करत असल्याची माहिती पोलीसाना मिळावी त्यावरून त्यांनी कैलास पवार यांच्या घरी धाड टाकून सरकारी पंचासमक्ष साहित्य जप्त केले आहे

सिंदखेड राजा (जि.बुलडाणा) : सिंदखेड राजा शहरांमध्ये अवैध काडतुससह अनेक अवैध साहित्यांची जमवाजमव होत असल्याची माहिती सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव ,पोलीस उपनिरीक्षक राम पारवे यांना गुप्तहेरा कडून माहीती मिळाली. 

त्यानुसार सिंदखेड राजा पोलिसांनी सापळा रचुन तारीख ७ ऑगस्ट रोजी ३ जिवंत देशी काडतुस व नकली सोन्याच्या गिन्यासह अन्य अवैध साहित्य जप्त  करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे सिंदखेड राजा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सिंदखेड राजा पोलिसांच्या गुप्तहेरानी दिलेल्या माहितीच्या आधारे कार्यवाही केली आहे. सविस्तर असे की, सिंदखेड राजा शहरांतील कैलास पवार वास्तवास होता, त्यांने स्वतःच्या घरी देशी जिवंत काडतुससह अनेक अवैध साहित्यांची जमवाजमव करत असल्याची माहिती पोलीसाना मिळावी त्यावरून त्यांनी कैलास पवार यांच्या घरी धाड टाकून सरकारी पंचासमक्ष साहित्य जप्त केले आहे. 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शहरांतील कैलास गंगाराम पवार वय ३० वर्ष यांच्या राहत्या घरी सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राम पारवे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार ,पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे व पोलीस कर्मचाऱ्यांसह २ सरकारी पंच सोबत घेवून कैलास पवार यांच्या घरी धाड टाकली.

काय सापडलं
घरांमधून गोवा,नजर कंपनीचे १८ गुटका पॉकेट, रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारू चे ८ बॉटल, सखु संत्रा कंपनीचे देशी दारूचे ५ बॉटल तसेच २ लोखंडी कोयते, २ लोखंडी सुरा, ३ धारदार चाकू व देशी बनावटीचे ३ जिवंत काडतूस व नकली सोन्याच्या गिण्या वजन अंदाजे १ किलो २०० ग्रॅम व नकली सोन्याच्या गिन्या बनवण्याचे २ शिक्के सहकारी पंचा समक्ष पंचनामा करून सर्व साहित्य जप्त करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे.

आरोपी फरार
कैलास पवार यांचा त्यांच्या घरी शोध घेतला असता तो मिळुन आला नाही, आरोपी फरार झाला असून त्यांचा शोध सिंदखेड राजा पोलीस घेत आहे. सदर गुन्हा प्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर १५६/२० आर्म act ३/२५, ४/२५ आयपीसी सेक्शन ३२८ ,१८८ ,२७२, २७३ प्रोव्ही एसीटी ६५ (इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राम पारवे करत आहेत.

 

पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव
 सिंदखेड राजा पोलिसांनी मागील चार ते पाच दिवसांमध्ये अनेक अटल गुन्हेगाऱ्याना अटक करण्याची कामगिरी सिंदखेड राजा पोलीसांनी केली आहे. त्यामुळे सिंदखेड राजा शहरासह परिसरात पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तारीख ३ ऑगस्ट रोजी शहरांतील टी- पॉईंट जवळ चाकूच्या धाकावर बहिण-भावास लुटण्याचा प्रकार घडला होता,त्यानंतर सिंदखेड राजा पोलिसांनी ४ तासांमध्ये आरोपीला गजाआड केले होते. तारीख ७ ऑगस्ट रोजी ३ देशी जिवंत काडतुससह अनेक अवैध साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्यामुळेच शहरांतील व परिसरातील चोरी करणाऱ्या चोरावर पोलिसांनी वचक निर्माण केला आहे. त्यामुळे सिंदखेड राजा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, असे असले तरी या प्रसंगाने अनेक चर्चांना उधान आले आहे.
(संपादन- विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola sindkhed raja One kg of gold, three live cartridges and a large quantity of illegal material were found in the house