
'समृद्धी महामार्गावरील' पुलांचे गरडर कोसळले
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील जाणाऱ्या समृध्दी महामार्गाच्या पिंपळखुटा शिवारामध्ये असलेल्या पुलाच्या कामातील गरडर कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला.मात्र या घटनेत कोणतीच जीवित,वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.सद्या समृद्धी महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे. कारण तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गवर असलेल्या पुलाचे काम सद्या प्रगतिपथावर आहे.
तालुक्यातील पिंपळ खुटा येथील समृध्दी पॉइंट नंबर ३३२ येथे पुलाच्या गरडर फिकशिंग चे काम सुरू होते, क्रेन च्या सहायाने सुरू असलेल्या या कामातील एक गरडर क्रेन ने उचलत असताना खाली कोसळला यात घटनेत क्रेनसह एका वाहनाचे नुकसान झाले आहे.या घटनेत कोणतीच जीवित हानी झाली नसल्याचे समृद्धीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.व्हायडक आकाराचा हा पिलर कोसळल्याने समृद्धीच्या कामात कोणताच अडथळा होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाचे अभियंत्यांसह समृद्धी महामार्गाचे अधिकारी पाहणी करून काम पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.गरडर कोसळल्या मुळे मोठी तांत्रिक अडचण नसल्याचे समृद्धीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
जेवण करत असल्यामुळे मजूर वाचले :- समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे मार्गावर काम करण्यासाठी मजुर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते पिंपळखुटा येथे पुलाचे काम सुरू आहे.यांच पुलांचे गरडर कोसळले त्यावेळी मजूर जेवण करत होते.त्यामुळे कोणतेही मजूर त्याठिकाणी नसल्याने जीवित हानी झाली नाही त्यामुळे काळ आला होता परंतु वेळ आली नसल्याचे यावेळी पाहायला मिळाले परंतु या पुलाखाली उभे असलेले वाहनांवर पडल्यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे.
Web Title: Akola Sindkhed Raja Samrudhi Highway Bridge Work Collapsed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..