अकोला : पेट्रोल पंपावर सहा हजार लिटर डिझेलची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Pump

अकोला : पेट्रोल पंपावर सहा हजार लिटर डिझेलची चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला (मूर्तिजापूर) : पेट्रोल पंपाव एअर व्हॉल्व्हमधून रात्रीच्या सुमारास साडेपाच लाखांचे सहा हजारक लिटर डिझेल अज्ञात व्यक्तीने संपास केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.

तालुक्यातील हातगाव परिसरातील जमठी खुर्द शेत शिवारात दिल्ली-हैदराबाद प्रस्तावित हायवेवर नवीन कार्यान्वित होत असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. अंडरग्राऊंड टाकलेल्या डिझेल, पेट्रोलच्या टाक्यांना गळती आहे किंवा पाहण्याकरिता कंपनीच्या वतीने पाहणी करण्याकरिता डिझेल भरण्यात आले होते. त्यातून अज्ञात चोरट्याने प्लास्टिक पाईपच्या सहाय्याने एअर व्हॉल्व्हमधून सहा हजार लिटर डिझेल आताची अंदाजे किंमत पाच लाख ४६ हजार ६६० रुपयाचे डिझेल शनिवारी (ता.१३) रात्रीच्या दरम्यान घेऊन पसार झाला.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

कपिल अशोक रामटेके (वय ३५) रा. गुलजारपुरा अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जमठी खुर्द शेतशिवारात इंडियन ऑइल कंपनीचे नवे पेट्रोल पंपाचे बांधकाम सुरू आहे. कंपनीच्या नियमाप्रमाणे डिझेल व पेट्रोलचा साठा करण्यात येत असलेल्या टाकीत गळती आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता कंपनीकडून १२ हजार लीटर डिझेलचा साठा करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याने शनिवार (ता.१३) च्या मध्यरात्री दरम्यान टाकीला असलेल्या एअर पाईपमधून सहा हजार लिटर डिझेल कंपनीच्या किमतीनुसार पाच लाख ४६ हजार ६६० रुपये चोरून नेले. रामटेके यांच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३७९ भदंवि नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

loading image
go to top