

Akola Soldier Attains Martyrdom in Kupwara Sector
Sakal
अकोला : देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. ते भारतीय सेनेच्या १२ मराठा लाइट इन्फंट्री या युनिटमध्ये कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहीद वैभव लहाने हे जम्मू–काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये तैनात होते.