
राज्यातील मोठ्या IPS अधिकाऱ्याला 'ईडी'चे समन्स,देशमुखांशी लागेबांधे
शंभर कोटींच्या वसूली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चांदिवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे. आज सचिन वाझेची (Sachin Waze)उर्वरित चौकशी पार पडणार आहे. त्याचसोबत देशमुख देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे. मात्र देशमुखांशी निगडीत मनी लाँडरिंग प्रकरणात आता आकोल्याच्या पोलीस अधीक्षकांना समन्स देण्यात आलं आहे.(Akola SP)
अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (G.Shridhar) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) समन्स जारी केला आहे. यानुसार त्यांना येत्या 17 डिसेंबरला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे. यासाठी ते उपस्थित देखील राहणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अनिल देशमुख यांच्यासंबंधी मनी लाँडरिंगचं प्रकरण (Money Laundering) सुरू आहे. खंडणी प्रकरणातही त्यांची चांदिवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे. या संपूर्ण चौकशीत जी. श्रीधर यांचं नाव समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीनंतर या प्रकणारत श्रीधर यांचा असलेला सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक, अकोला
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर आणि वाझेशी असणारे संबंध उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा सुरूच आहे.
देशमुख यांच्याशी निगडीत विविध मालमत्तांवर ईडीने याआधीच छापे देखील टाकले. प्रकरण इथेच नाही थांबलं, तर या कथित घोटाळ्यासंदर्भात चांदिवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली. त्यानुसार वाझे आणि देशमुख यांची चौकशी सुरू आहे. त्यातच आता अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांनाही चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.
Web Title: Akola Sp G Shrikant Summoned By Ed In Anil Deshmukh Money Laundering Enquiry
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..