अरे हे काय? धावत्या ऑटोरिक्षात विवाहितेचा केला विनयभंग, ऑटो थांबताच तो...

शाहिद कुरेशी
Friday, 24 July 2020

धावत्या ऑटोरिक्षात 32 वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना गुरुवारी (ता.23) बोराखेडी नजीक घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून शुक्रवारी (ता.24) त्याला अटक केली आहे.

मोताळा  : धावत्या ऑटोरिक्षात 32 वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना गुरुवारी (ता.23) बोराखेडी नजीक घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून शुक्रवारी (ता.24) त्याला अटक केली आहे.

तालुक्‍यातील नेहरूनगर येथील 32 वर्षीय विवाहितेने बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, फिर्यादी ही गुरुवारी (ता.23) दुपारी तीन वाजताच्या सुमारास ऑटोरिक्षात बसून मोताळ्याहुन नेहरूनगर येथे जात होती. पीडितेचा पती चालकाच्या बाजूला तर, पीडिता मधल्या सीटवर बसलेली होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दरम्यान, तिच्या पाठीमागील सीटवर बसलेला अनिल उर्फ नाना रामभाऊ धुरंधर (वय 37, रा. वाघजाळ ह.मु. मुंबई) याने पीडितेचा विनयभंग केला. या प्रकाराने पीडिता घाबरली व जोरात ओरडली. त्यामुळे ऑटो चालकाने गाडी थांबवली असता, आरोपी अनिल उर्फ नाना धुरंधर याने ऍपेरिक्षातून उडी घेऊन पळ काढला.

याप्रकरणी उपरोक्त तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी अनिल उर्फ नाना रामभाऊ धुरंधर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अशोक रोकडे, पोकॉं संजय गोरे करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola speeding autorickshaw molested a married woman, he ran away as soon as the auto stopped