esakal | एसटी कर्मचारी, कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय, वेतनाअभावी होतेय उपासमार !
sakal

बोलून बातमी शोधा

akola ST workers, who is doing wages, who has started a business on a handcart, is starving due to lack of salary!

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साडेचार महिन्यांपासून राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवा बंद आहे. त्यात एसटी बस सेवाचाही समावेश आहे. बसची चाके थांबली असल्याने महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचे वेतनही थांबवण्यात आले आहे.

एसटी कर्मचारी, कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय, वेतनाअभावी होतेय उपासमार !

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साडेचार महिन्यांपासून राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवा बंद आहे. त्यात एसटी बस सेवाचाही समावेश आहे. बसची चाके थांबली असल्याने महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचे वेतनही थांबवण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी कुणावर मजुरी करण्याची वेळ आली आहे तर कुणी दुसऱ्याच्या शेतात राबतो आहे. कुणी हातगाडीवर व्यवसाय सुरू करून उदर्निवाहाचे साधण शोधले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सरकारने एसटीचे चाक रुतवून ठेवले आहे. त्यामुळे दररोज एसटी महामंडळाला मिळणारे २२ कोटी उत्पन्न बुडत आहे. आजवर महामंडळाचे जवळजवळ २६४० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

परिवहन मंत्री आणि संबंधित विभाग याबाबत अजिबात गंभीर आणि संवेदनशील नाही. त्यातच कंत्राटी सेवा देणारे कर्मचारी कमी करण्याचे आणि सक्तीने सेवा निवृत्ती देण्याचा सपाटा सरकारने सुरू केला आहे.

गेली चार महिने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची उपाययोजना आखण्याची तसदी देखील सरकार घेत नाही. अनेक महामंडळे व सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. लॉकडाउनच्या कालावधित सर्व सरकारी कार्यालये बहुतांशी बंद होती. परंतु त्यांचे वेतन चार महिने थांबले नाही.

तोटा वाढल्याने महामंडळाची आर्थिक अवस्था बिकट झाली, हे कारण सांगून एसटी कर्मचऱ्यांना वेठीस धरले जात आहे. त्यातच ९० हजार कर्मचाऱ्यांना २० दिवस सक्तीच्या रजेवर जाण्याचे तुघलकी आदेश काढण्यात आले आहेत.

एसटी सेवा सरकारने बंद ठेवली आहे, त्याला कर्मचारी जवाबदार नाहीत. सरकारने पर्यायी यंत्रणा म्हणून एसटीचा वापर केला असता तरी मालवाहतूक आणि इतर कामांसाठी एसटी कार्यरत राहिली असती. ते न करता सरकारने पगार थांबविला आहे.

मार्च महिन्याचा २५ टक्के, मे महिन्याचा पन्नास टक्के पगार दिला नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गणेशोत्सवापूर्वी मिळावे वेतन; ‘वंचित’चा आग्रह
एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारने गणेशोत्सवा पूर्वी अदा करावे. महामंडळ बंद होऊ नये यासाठी उपाययोजना आखावी. कर्मचारी कपात आणि सक्तीच्या रजा व सेवानिवृत्ती या अघोरी प्रथा बंद करण्यात याव्यात. अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे हजारो कामगार आणि लाखो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा ‘वंचित’चे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.

एसटी वाचवा, या उपाययोजना करा!

  • विभागातील सर्व मार्गांवरील उत्पन्नाच्या व प्रवाशांच्या आकडेवारीवरून जास्त उत्पन्न देणारे, कमी उत्पन्न देणारे व अत्यल्प उत्पन्न देणारे असे मार्गांचे ग्रेडिंग करा.
  • कमी व अत्यल्प उत्पन्न देणाऱ्या मार्गावरील गाड्या रद्द करून त्यांचा मालवाहतूक व पर्यायी व्यवस्थे साठी वापर करा.
  • जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या मार्गावरील गाड्या कोणत्याही परिस्थितीत रद्द करू देऊ नये.
  • एकाच मार्गावर जाणारे किमान ४० प्रवासी असल्यास एसटीकडून त्यांना घरपोच सेवा दिली जावी.
  •  आरामदायी प्रवासासाठी पुश बॅक सिट सिस्टिम असलेल्या गाड्या नेहमीच्या तिकीट दरात उपलब्ध करून दिल्या पाहिजे.
  • एसटीने विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजात जाऊन पास नूतनीकरण करून देण्याची व्यवस्था केली पाहिजे.
    (संपादन - विवेक मेतकर)