Akola Summer : उन्हाचे चटके अन् घामाच्या धारांनी अकोलेकर बेजार

दिवसाचे वाढते तापमान आधिच डोकेदुखी ठरत असताना, रात्रीसुद्धा पारा २९ अंशावर गेल्याने अकोलेकरांना आगभट्टीची प्रचिती येत आहे.
summer heat increase in akola
summer heat increase in akolasakal

अकोला - दिवसाचे वाढते तापमान आधिच डोकेदुखी ठरत असताना, रात्रीसुद्धा पारा २९ अंशावर गेल्याने अकोलेकरांना आगभट्टीची प्रचिती येत आहे. उरलीसुरली कसर आर्द्रता वाढीने व दमट वातावरणाने पूर्ण केली आहे. उष्णता व गर्मी, दमट वातावरणामुळे कुलर, डेझर्टसुद्धा थंडावा निर्माण करण्यात असर्मथ ठरत आहेत. त्यामुळे रात्रभर घामांच्या धारांनी नागरिकांना बेजार करून सोडले आहे.

खरा उन्हाळा म्हणजे मे महिन्यातील ऊन अशी, वाक्यरचनाच बनली आहे. एप्रिल अखेरपर्यंत वातावरणातील बदलांमुळे कधी तापमानात वाढ तर, कधी उतरण, कधी शितलता तर, कधी दाहकता, असे समिकरण अनुभवाला आले. परंतु, मे च्या सुरुवातीपासून सूर्याने आग ओकने सुरू केले.

आठवडाभरापासून तापमानाचा जोर वाढल्याने, पार ४४ अंशापार गेला आहे. रविवारी (ता.२) अकोल्यात कमाल तापमान ०.७ अंशाने घटून ४२.८ अंशसेल्सिअस नोंदले गेले मात्र, किमान तापमान २९ अंशसेल्सिअस नोंदवले गेले.

कमाल तापमान ४२ अंशापार असल्याने दिवसभर रखरखत्या उन्हाचा नागरिकांना सामना करावा लागत आहेच मात्र, किमान तापमानातील वाढीमुळे व दमटपणामुळे गर्मीचे प्रमाण प्रचंड वाढून नागरिकांची घुसमट होत आहे.

जीव गुदमरतोय

सकाळची आर्द्रता ४५ टक्क्याहून अधिक व सायंकाळी २६ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने वातावरणात दमटपणा वाढून घुटमळ व्हायला लागते. अशावेळी किमान तापमानही २९ अंशापर्यंत गेल्यामुळे रात्रीसुद्धा उष्ण झळा आणि दमटपणा यामुळे जीव गुदमरल्यागत अनुभव अकोलेकरांना येत आहे. शहरामध्येतर कुलर, डेझर्टचा वापर करूनही मध्यरात्री उशिरापर्यंत चिपचिपत्या गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com