कर्तव्यावर अनधिकृतपणे गैरहजर राहणे भोवले, आमदारांच्या अकस्मित भेटी दरम्यान प्रकार उघड

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 24 June 2020

विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी ८ जून रोजी प्राथमिक.आरोग्य केंद्र हिवरखेड -१ येथे आकस्मिक भेट दिली असता आरोग्यसेवक धीरज निमकर्डे व परिचर श्रीमती डि.आर.नागे हे त्यांचे कर्तव्यावर कुठलिही सूचना न देता अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे आढळून आले होते.

अकोला  : विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी ८ जून रोजी प्राथमिक.आरोग्य केंद्र हिवरखेड -१ येथे आकस्मिक भेट दिली असता आरोग्यसेवक धीरज निमकर्डे व परिचर श्रीमती डि.आर.नागे हे त्यांचे कर्तव्यावर कुठलिही सूचना न देता अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे आढळून आले होते.

सद्या संपूर्ण जिल्हयात कोरोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव झालेला असुन आरोग्य कर्मचा-यांनी त्यांचे मुख्यालयी चोविस तास हजर राहणे आवश्यक असताना आरोग्यसेवक व परिचर यांनी वरिष्ठांची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता मुख्यालयी गैरहजर असल्याचे आढळून आले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यांनी त्यांचे कर्तव्यामध्ये कसुर केल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा वर्तणुका नियम१९६७ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्यामुळे धीरज निमकर्डे व श्रीमती डि.आर नागे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेता (शिस्त व अपिल) नियम १९६४ मधील भाग तीन ४ (दोन) नुसार एक वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम न होता रोखण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढला आहे.

यापुढे त्यांचे वर्तणुकीत आवश्यक सुधारणा न केल्यास त्यांचे विरुध्द नियमानुसार प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल व सदर आदेशाची नोंद सबंधीताचे मुळ सेवापुस्तकामध्ये घेण्यात यावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केले आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये आरोग्य विभागासह सर्व विभाग देवदूत म्हणून कार्य करीत असतांना अशा काळामध्ये कुठलीही सूचना न देता अधिकारी गैरहजर राहत असतील तर ही नक्कीच गंभीर बाब आहे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे हे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Surrounded by unofficial absenteeism on duty, the type revealed during surprise visits of MLAs