

Akola
esakal
श्रीकांत राऊत
अकोला: शहरातील रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तारफैल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जुन्या वैमनस्यातून एका युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके सक्रिय केली आहेत.