अकोला, तेल्हारा पंचायत समितीवर वंचितचा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला, तेल्हारा पंचायत समितीवर वंचितचा झेंडा

अकोला, तेल्हारा पंचायत समितीवर वंचितचा झेंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला व तेल्हारा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी (ता. २२) पार पडली. निवडणुकीत सभापती पदाची माळ वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांच्या गळात पडली. त्यामुळे दोन्ही पंचायत समितीवर वंचितचा झेंडा फडकला. अकोला पंचायत समिती सभापती पदी उपसभापती राजेश वावकार यांची निवड करण्यात आली, तर तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतीपदी उज्ज्वला हेमराज काळपांडे यांची अविरोध निवड करण्यात आली.

अकोला पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक सोमवारी (ता. २२) पार पडली. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार सभापती पदासाठी सकाळी ११ वाजतापासून दुपारी १ वाजेपर्यंत पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी वंचितच्या वतीने विद्यमान उपसभापती राजेश वावकार, तर शिवसेनेचे गजानन वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी ३ वाजता निवडणुकीसाठी विषेश सभा घेण्यात आली.

सभेच्या वेळी मतदानापूर्वी भाजपचे तीन सदस्य निवडणुकीसाठी पोहचले नाही. यावेळी वंचितचे संख्याबळ अधिक असल्याने शिवसेनेचे गजानन वानखडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सभापती पदी वंचितच्या राजेश वावकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे गुरुवार (ता. १८) उपसभापती पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत सुद्धा वंचितकडून राजेश वावकर यांना संधी देण्यात आली होती. सभापती पदाची निवडूक आटोपल्यानंतर वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

loading image
go to top