अकाेला : तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची स्थिती वाईट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Telhara taluka Bad roads condition

अकाेला : तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची स्थिती वाईट

तेल्हारा - अकोला, शेगाव, अकोट, जळगाव हे प्रमुख रस्ते नुसते खोदुन ठेवल्याने या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात तर प्रवाशांच्या हालाला पारावर उरत नाही. या खराब रस्त्या अभावी तेल्हारा आगारातून बसेस सोडण्यात येत नाहीत. केवळ मनब्दा-भांबेरी बस सुरू आहेत. आकोला-निंबा मार्गे जळगाव वरवट मार्गाच्या बसेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

रस्ते चिखल मय झाले आहेत. जाणारे येणारे वाहने या रोडवर फसत आहेत. वाहने घरसत असल्याने जनतेच्या हालाला पारावार उरली नाही. त्यामुळे हे रस्ते सध्या नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. आतापर्यंत नागरिकांनी तक्रारी, उपोषण,आंदोलने केले; परंतु या रस्त्याची कामे न होता अधोगती झाली आहे. अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांनी देखील हा प्रश्न सध्याचे नव्या सरकार मधील नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात मांडणे महत्त्वाचे झाले आहे. शिवाय मुख्यमंत्री यांनी देखील रस्त्याच्या कामात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

जनतेला या रस्तात्यामुळे अनेक वर्षांपासून नरक यातना सोसाव्या लागत आहे. खोदुन ठेवलेल्या या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. काहींना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मुत्यूला सामोरे जावे लागत आहे. काहींना कायमचे अपंगत्व आल्याच्या घटना घडल्या आहेत.

रस्त्याचे घोडे अडले कुठे?

तेल्हारा तालुक्यातील रस्त्याच्या कामाचे घोडे अडले तरी कुठे? हा संशोधानाचा विषय बनला आहे. शासन, प्रशासनाने मनावर घेतले तर या रस्त्यांची कामे होण्यास कोणताही विलंब लागणार नाही. रस्त्याच्या बाबतीत कोणाला काही देणेघेणे नसल्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

कंत्राटदारांची धरसोड!

तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची कामे अनेक कंत्राटदारांनी घेतले आहे. काही दिवस काम केल्यानंतरही कंत्राटदार काम सोडून जात असल्याची आजपर्यंतची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम कासव गतीने सुरू आहे. संबंधित कंत्राटदारावर अधिकाऱ्यांचा वचक नाही. शिवाय संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदार पणामुळे हा सर्व त्रास जनतेला सोसावा लागत आहे. या रोडवर लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना अजुन किती अपघात हवे आहेत, असा संतप्त प्रश्र्न जनतेकडून विचारल्या जात आहे.

लोकप्रतिनिधी आहेत कुठे?

तेल्हारा तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आङे. नागरिकांना प्रवास करता येत नसल्याने त्यांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. असा एकही दिवस नाही की या रस्त्यावर अपघात झाला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी जनतेच्या त्रासाचा अंत पाहू नये. या भागाचे आमदार, खासदार यांना तेल्हारा तालुक्यातील नागरिकांची कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींबाबत जनतेच्या मनात रोष निर्माण होत आहे.

चिखल तुडवत जावे लागते तेल्हाऱ्याला

हिवरखेड, तळेगाव बाजार, खडांळा, गोर्धा आकोली, काळेगाव, अडगाव कार्ला या गावातील नागरिकांना तहसील, पंचायत समिती, कृषी कार्यालय, बाजार समितीमध्ये नेहमीच महत्त्वाच्या कामासाठी तेल्हारा येथे जावे लागते. मात्र, रस्त्यांची परिस्थिती पाहता तेल्हारा जाणे अनेक जण टाळतात. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तेल्हारा जावे लागते. नाईलाज असल्याने दररोज चिखल तुडवितच ते तेल्हारा येथे जातात.

मी, यावर्षी गोपाळराव खेडकर महाविद्यालय येथे प्रवेश घेतला आहे. शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दोन वेळा मोटारसायकल पडून हाताला दुखापत झाली. तरीही शिक्षण घेण्यासाठी जावे लागते.

- गौरव पाटील, विद्यार्थी, तळेगाव बाजार

Web Title: Akola Telhara Taluka Bad Roads Condition Accident Construction Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..