अकोला : शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वांचे धाबे दणाणले

वेतन थांबवण्याची प्रक्रिया सुरु; इतरांचे धाबे दणाणले
Akola TET exam scam
Akola TET exam scamesakal
Updated on

अकोला : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) घोळ करून बोगस प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाली आहे. सदर यादीमध्ये जिल्ह्यातील सात शिक्षकांचा समावेश आहे. संबंधित शिक्षकांनी पात्रता नसताना टीईटी प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यामुळे आता त्यांचे वेतन थांबवण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल १९ जानेवारी २०२० ला जाहीर झाला होता. या परीक्षेला १६ हजार ५९२ उमेदवार पात्र ठरवण्यात आले होते. त्यातील सात हजार ८०० उमेदवार अपात्र असताना त्यांच्याकडून हजारो रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे यात ४० ते ५० कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले होते. याची चौकशी पुणे सायबर पोलिसांद्वारे करण्यात आली.

दरम्यान राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंत रुजू शिक्षकांचे मूळ टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा निर्णय घेतला हाेता. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला.

त्यानुसार शिक्षण विभागाने प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया राबविली हाेती. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील ५२१ प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी नेमके किती रद्द ठरले, याकडे अवघ्या शिक्षण विभागाचे लक्ष लागले होते. दरम्यान आता बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या सात शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे संबंधितांचे वेतन थांबवण्यात येणार आहे.

ऑगस्टपासून वेतन रोखण्याचे आदेश

टीईटीतील गैरव्यवहार व त्याअनुषंगाने कार्यवाहीबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांना आदेश पाठवला आहे. अपात्र उमेदवारांचे शालार्थ आयडी गाेठवण्यात आले असून त्यांंना ऑगस्ट २०२२पासून ऑनलाईन अथवा ऑफलाईन वेतन अदा हाेणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांना वेतन अदा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तवित करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या शिक्षकांचा समावेश

बोगर प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्यांमध्ये सात जणांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रवीणकुमार वसंतराव बाेरकर (पत्ता-श्री समर्थ गजानन महाराज मराठी प्राथमिक शाळा, अकाेला), सै. आतिफ अली सै. मुमताज अली (सफुरा शेख उर्दू प्राथमिक शाळा, अकाेट), राजीव प्रकाश खिराेडकर (गुरुमाऊली प्राथमिक शाळा, अकाेट), दुर्गा नारायण हाेेरे (माताेश्री मराठी प्राथमिक शाळा, महान), सुषमा दत्तात्रय शिताेळे (सेंट ॲन्स प्रा. स्कूल), पल्लवी सुरेश शेवाने (सेंट ॲन्स प्रा. स्कूल) आणि गाैरव अर्जून काैलकर (सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर, हिवरखेड) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com