

Swift Dzire Stolen and Sold by Original Owner
Sakal
अकोला : दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी हिंगणा रोडवरील कारवर्ल्ड गॅरेजसमोर उभी असलेली स्विफ्ट डिझायर (क्र. एम.एच.-३० बीएल-६८४४) दोन अज्ञात इसमांनी मोपेडवर येऊन चोरी केली होती. या प्रकरणी पोस्टे खदान येथे गुन्हा नोंद झाला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांच्या एलसीबी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित अक्षय मनोहर मसने (रा. मोठी उमरी) आणि त्याचा साथीदार गणेश प्रविण पालवे (रा. खेडकर नगर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी अक्षय मसने हा सदर कारचा जुना मालकच निघाला. कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीने त्याची ही कार जप्त करून लिलावात विक्री केली होती. लिलावातून वाहन खरेदी केलेल्या फिर्यादीकडे कार दुरुस्तीसाठी कारवर्ल्ड गॅरेजमध्ये उभी होती.