ड्यूटीवर जाणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या दुचाकीसमोर अचानक आले वाहन अन्

akola Two-wheeler hit by unknown vehicle, woman killed on the spot Incident near Appu Point under MIDC Police Thane
akola Two-wheeler hit by unknown vehicle, woman killed on the spot Incident near Appu Point under MIDC Police Thane
Updated on

अकोला: बोरगाव मंजू येथे बोरगाव मंजू येथे विदर्भ कोकण बँकेमध्ये कर्मचारी असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. 

ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील अप्पू पॉईंट जवळ घडली.


याबाबत सविस्तर माहिती अशी की अकोला शहरातील कौलखेड भागात राहणारी एक महिला बोरगाव म्हणजे येथे असलेल्या विदर्भ कोकण अर्बन बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत होती नेहमीप्रमाणे बँकेत जाण्यासाठी त्या स्कूटी क्रमांक एम एच 30 ए एक्स 3148 जात असताना एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अप्पू पॉईंट जवळ एका अज्ञात वाहनाने सदर स्कुटीला धडक दिली.

यामध्ये महिला कर्मचारी यांचा जागेवरच मृत्यू झाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचे नाव प्रीती  महल्ले असल्याचे कळते.

तरीही एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण या प्रकरणावर बारकाईने लक्ष देत असून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत सोबतच मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com