बैल जोडिला दुधाने आंघोळ घालुन स्वाभिमानीचे अनोखे आंदोलन, दखल न घेतल्यास अन्न धान्यही बंद करु  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola unique movement of self-respect by bathing a pair of oxen with milk, if not noticed, we will also stop food grains.

बैल जोडीची दुधाने आंघोळ घालुन स्वाभिमानीने अनोखे आंदोलन केले आहे. सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला 5 रुपये अनुदान द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार ठीक ठीकाणी कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत. स्वाभिमानी युवाचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तृत्वात निरोड(बाजार)येथे ग्रामस्थांनी चक्क बैल जोडीला दुधाची आंघोळ घालुन शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.

बैल जोडिला दुधाने आंघोळ घालुन स्वाभिमानीचे अनोखे आंदोलन, दखल न घेतल्यास अन्न धान्यही बंद करु 

जळगाव  जामोद (जि.बुलडाणा) ः बैल जोडीची दुधाने आंघोळ घालुन स्वाभिमानीने अनोखे आंदोलन केले आहे. सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला 5 रुपये अनुदान द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार ठीक ठीकाणी कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत. स्वाभिमानी युवाचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तृत्वात निरोड(बाजार)येथे ग्रामस्थांनी चक्क बैल जोडीला दुधाची आंघोळ घालुन शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले आहे.


सरकारने दुधाला प्रती लिटर 5 रुपये अनुदान द्या, दुध पावडरला प्रती किलोला 50 रुपये अनुदान द्यावे. व तुप, दुध पावडर, व बटर यावरील जी एस टी कमी करावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडुन करण्यात आली आहे. सरकारने राजु शेट्टी साहेब यांच्या दुध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल असा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला दिला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या आंदोलनामधे स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अंनता मानकर,जिल्हा सरचिटणीस रोशन देशमुख,शाम ठाकरे,वैभव मुरुख,गजानन सोळे,गणेश सांवत, शांताराम पाटील,ऊमेश सौदागर, अमोल आगरकर,जनार्दन परमाळे गणेश सौदागर गणेश वहीतकार,संजय सुरळकर,कीसन वसतकार, निलेश साबे,रामदास सुरळकार, ऋषिकेश देशमुख, सह बहुसंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.अनोख्याआंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वाभिमानाच्या ह्या दुग्ध अभिषक आंदोलनाची सर्वदूर चर्चा आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Web Title: Akola Unique Movement Self Respect Bathing Pair Oxen Milk If Not Noticed We Will Also

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon
go to top