

Akola
esakal
अकोला: मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर शासनाकडून आर्थिक दिलासा मिळाला आहे. मार्चमधील पावसामुळे ९७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेल्या १,४७६ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.