Akola News: १.६९ कोटींच्या मदत निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर; ९७ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा; अवकाळी पावसामुळे झाले होते नुकसान

Akola Farmers Suffer Due to Unseasonal Rain: अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे १,४७६ शेतकऱ्यांचे ९७५.३१ हेक्टर पीक नष्ट झाले. जिल्हा प्रशासनाने १.६९ कोटींच्या मदत निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे एक हजार ४३ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा अंतिम प्रस्ताव जिल्हास्तरावर रखडला होता. अखेर प्रस्ताव तयार झाला असून शासनाकडे मदत निधी मागणीसाठी पाठवण्यात आला आहे.

त्यानुसार ९७ गावांतील १ हजार ४७६ शेतकऱ्यांचे ९७५.३१ हेक्टरवर पीक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी १ कोटी ६९ लाख २६ हजार रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com