

Akola News
esakal
अकोला: यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीटमुळे पिकांची प्रचंड हानी झाली असून, तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
गतवर्षी खरीप नंतर रब्बीमध्येही अवकाळी पऊस झाला. मात्र, पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने यंदाचा उन्हाळा कमी जाणवेल, असा सामन्यांचा अंदाज हाेता. मार्चमध्ये पारा ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नाेंदवण्यात आला.