esakal | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Washim Corona News Maharashtra Four teachers, including 229 students from a residential school, were also infected with the corona

पश्चिम विदर्भात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असाताना वाशीम जिल्ह्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निवासी शाळेला भेट देवून येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांनाही कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यातील रिसोड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या देगाव येथील एका निवासी शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहात राहणारे तब्बल २२९ विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

पश्चिम विदर्भात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असाताना वाशीम जिल्ह्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निवासी शाळेला भेट देवून येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

या निवासी शाळेत, चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या शाळेचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) घोषित करण्यात आला आहे.

हेही वाचा -   कोरोनाचा विस्फोट; एकाच रात्रीत अवघे गाव झाले हॉटस्पॉट

कोरोना बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणारे आहेत.

या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

  • अमरावती जिल्ह्यातील १५१,
  • यवतमाळ जिल्ह्यातील
  • ५५, वाशिम जिल्ह्यातील ११,
  • बुलडाणा जिल्ह्यातील ३,
  • अकोला जिल्ह्यातील १,
  • हिंगोली जिल्ह्यातील ८  

सर्व विद्यार्थ्यांची होणार चाचणी
शाळेमध्ये निवासी स्वरुपात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी निगेटिव्ह आहेत, त्यांची संपूर्ण व्यवस्था स्वतंत्र ठेवण्यात आली तसेच बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर स्थानिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. 

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

loading image