
कधीकाळी वत्सगुल्म राजाची राजधानी ते बाळासाहेबांची समृध्द नगरी अशी ओळख असलेले शहर एक बकाल जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. धुळीने माखलेले रस्ते, रस्त्याच्यावर कपाळमोक्ष करणारे चेंबर व नवीन बनविलेल्या रस्त्यावरील उडणारी गिट्टी हे राजाश्रयाखाली फोफावलेल्या कंत्राटदाराचे पातक शहरवासीयांच्या नशिबी उतरले असून सत्तेतून पैसे मिळविण्यासाठी राजकारणीच कंत्राटदार झाल्याने बाळासाहेबांच्या या नगरीची अवस्था बकाल झाली आहे.
वाशीम : कधीकाळी वत्सगुल्म राजाची राजधानी ते बाळासाहेबांची समृध्द नगरी अशी ओळख असलेले शहर एक बकाल जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. धुळीने माखलेले रस्ते, रस्त्याच्यावर कपाळमोक्ष करणारे चेंबर व नवीन बनविलेल्या रस्त्यावरील उडणारी गिट्टी हे राजाश्रयाखाली फोफावलेल्या कंत्राटदाराचे पातक शहरवासीयांच्या नशिबी उतरले असून सत्तेतून पैसे मिळविण्यासाठी राजकारणीच कंत्राटदार झाल्याने बाळासाहेबांच्या या नगरीची अवस्था बकाल झाली आहे.
वाशीम शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. शहराच्या सभोवताली नवीन वसाहती उभ्या राहत आहेत. या वसाहतीची जहागिरी शहरातील राजकारण्यानी घेतल्यानंतर या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचे दायीत्वही त्यांनी घेतले होते.
हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री
सुविधा निर्माण होतील, रस्ते तयार होतील ही आशा शहरवासीयांना होती मात्र, रस्ते बनविण्याचे कंत्राट आपल्याच बगलबच्यांना मिळाले पाहिजेत त्यातून आपलेही आर्थीक हीत साधले गेले पाहिजेत. या हेतूने शहराचा कायापालट करण्याची शेखी मिरविणाऱ्या नेत्यांनी आपलेच हीत साधून शहरवासीयांच्या नशिबी मात्र, खड्डे आंदण देण्याचे काम केले आहे.
शहरामध्ये गत चार वर्षात कोट्यावधी रूपयांचे रस्ते तयार केले मात्र, सहा महिन्यातच हे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. यामध्ये राजकीय छत्रछायेत नांदणाऱ्या कंत्राटदारांनी माया कमावून घेतली असली तरी, नागरिकांचा वनवास मात्र कायम आहे. स्वार्थ्यासाठी राजकीय कोलंटउड्या मारत कधी काळच्या राजकीय शत्रुंच्या गळ्यात गळे घालण्याचे काम फक्त समर्थक कंत्राटदाराचे हीत साधण्यासाठीच केल्या जात असल्याच आरोप जनतेमधून होत आहे.
हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच
भूमिगत गटार योजनेने लावला चुना
शहरामध्ये गरज नसताना तत्कालीन पुढाऱ्यांनी शासनाचा रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी भूमिगत गटार योजना शहरवासीयांच्या माथी मारली. तब्बल पाच वर्ष चिखल स्नानाचा झळ नागरिकांनी सोसला. मात्र, त्यानंतर भूमिगत गटार योजना भ्रष्टाचाराची गटार योजना ठरली. या भूमिगत गटार योजनेमुळेच अनेक रस्त्याची वाट लागली. आठ वर्षाचा कालावधी उलटूनही ना शहरातील नाल्या बंद झाल्या ना भूमिगत गटार योजनेतून गटाराचे पाणी वाहले. मात्र, या भूमिगत गटार योजनेतून मिळालेला शेकडो कोटी रूपयांचा रस्त्याचा निधी राजकीय वरदहस्तावता मस्तवाल झालेल्या कंत्राटदारीने गिळला.
हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’
चालविण्यापेक्षा अडविण्यातच धन्यता
शहर विकासासाठी राज्य शासनाने भरपूर निधी दिला. मात्र, तो निधी आपल्या ले-आऊटच्या रस्त्यासाठी वापरण्याच्या क्लृप्तीने अनेक अभद्र राजकीय युतींना जन्म दिला. यातूनच अकोला नाका ते पाटणी चौक हा शहरातील मुख्य मार्ग रखडला. निविदा प्रकाशीत झाली. मात्र, तरीही गेल्या सात वर्षापासून या रस्त्यावर नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागतात. याआधीही हा रस्ता शहरातील राजकीय नेत्याच्या छत्रछायेत राहणाऱ्या कंत्राटदारानेच तयार केला होता. सहा महिन्यात या रस्त्याचे तिन-तेरा वाजल्यानंतरही राजकीय दबावात पालिकेच्या बांधकाम विभागाने निरलज्जतेचा कळस गाठत या कंत्राटदाराला क्लीनचिट दिली होती.
(संपादन - विवेक मेतकर)