निवडणूक अधिकारी म्हणतात, मतदानासाठी करावी लागणार कोरोना टेस्ट

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 15 January 2021

मतदान कक्षात बसणाऱ्या निवडणूक प्रतिनिधींना कोरोना चाचणी करावी लागणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक शुक्रवारी (ता.१५) होणार आहेत. त्या अनुषंगाने मतदान केंद्रावर जे पथक पाठवायचे आहे त्या पथकाची कोरोना चाचणी ता.९ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.

रिसोड (जि.वाशीम) ः मतदान कक्षात बसणाऱ्या निवडणूक प्रतिनिधींना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

रिसोड तालुक्यातील सवड येथे सकाळी दहा ते १ वाजेपर्यंत करता येईल अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदारांनी दिली आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक शुक्रवारी (ता.१५) होणार आहेत. त्या अनुषंगाने मतदान केंद्रावर जे पथक पाठवायचे आहे त्या पथकाची कोरोना चाचणी ता.९ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.

परंतु, सदर मतदानाचे दिवशी मतदान कक्षात उमेदवार निवडणूक प्रतिनिधी बसणार असल्यामुळे संबंधित उमेदवारांनी त्यांचा जो निवडणूक प्रतिनिधी मतदान कक्षात बसणार आहे त्याची कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

सदर कोरोना चाचणी कोविड केअर सेंटर सवड येथे सकाळी दहा ते १ या वेळेत करून घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Washim Marathi News- Election officials say, corona test will have to be done for voting