
शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला.
वाशीम : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. या विकोपामुळे एकच खळबळ उडाली. वाशीम यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना गवळी आणि कारंजा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मधील राजकीय वैर तसं जूनेच.
हेही वाचा -नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं
मात्र ,वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन येथे आज (ता.26) जिल्हा आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित राहणार होते. त्यापूर्वी विकास कामात अडथला निर्माण करून शिवसेनेने आणलेल्या विकास कामाला बाधा निर्माण का करता म्हणत, खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी आमने सामने आले आणि तू तू मै मै झाली.
या दरम्यान शिविगाळ झाली. तर शिवसेनेच्या कार्यकर्ते आमदार पाटणी यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला. आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशीम पोलीस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची तक्रार दाखल केली.
यावर राजेंद्र पाटणी यांना या विषयी विचारले असता त्यांनी सांगितलं की, मी कुठलाच वाद घातला नाही. तर शिवसेना खासदार भावना गवळी यांना झालेल्या प्रकारावर विचारले असता नंतर बोलेल अस सांगून बोलण्याच टाळले.
हेही वाचा - आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजप सेनेचे कार्यकर्ते जमा झाल्या ने वाद उदभवणार हे लक्षात येताच पोलिसांनी बंदीबस्तात वाढ केली होती. या प्रकारानंतर भाजपच्या वतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
(संपादन - विवेक मेतकर)