Video : या आज्जीबाईंचा आवाज ऐकाच, त्यांच्या चंद्रमौळी झोपडीतून गजबजतात सुमधूर सुर

Akola Washim News Chandramouli hut sighs, time of famine on folk artists: eyes of the rich of talent
Akola Washim News Chandramouli hut sighs, time of famine on folk artists: eyes of the rich of talent

वाशीम : येथील रेल्वेस्थानकाचा परिसर तसा गावकुसाबाहेर. 'नाही रे' ची वस्ती. म्हणायला शहराच्या शेजेला आणी महामार्गाच्या कडेला जरी असली तरी पिढ्यानपिढ्याच्या उपेक्षेचे हे वारसदारच ठरावेत इतकी उपेक्षा ही वस्ती सहन करतेय. याच वस्तीत एका चार टिनाच्या खोपटातून माणसाला शहाणं करणार्या तत्वज्ञानाचा दिव्य स्वर रोज बाहेर पडतो.

सकाळी भरल्यापोटी तो तानेवर ताना घेतो तर सायंकाळी भूकेच्या आकांताने कातर होतो. ती कातरता पांढरपेशाच्यांच्या गावीही नसली तरी गाण्यातून निघालेले स्वर पांढरपेशांनाच शहाण करण्यासाठी निघतात. गानकोकीळा अनेक झाल्या मात्र आयुष्याच्या सारिपाटावर पोटाची आग मांडतांना आलेले स्वर भल्याभल्या गायकांनी या स्वरसाम्राज्ञीचा गंडा बांधावा असे आहेत.

वाशीम शहरालगत रेल्वेस्थानकाजवळ पंचशिल नगर म्हणून एक उपेक्षातांची वस्ती आहे. दिवसभर मिळेल ते काम करून संसाराचा गाडा हाकण्यात येथील तीन पिढ्या खर्ची पडल्या आहेत. तेच चिखलाचे रस्ते, महिना पंधरा दिवसात कधीकतरी मिळणारे नळाचे गढूळ पाणी, एखाद्यावेळी नगरसेवक पावला तर दारापुढे लागलेला लाईट आणी त्या लाईटात कंबर कुचलेल्या कुडाच्या तर कुठे चार टिनाच्या झोपड्या ही या वस्तीची ओळख. मात्र ही वस्ती सायंकाळी सुरांनी भरून जाते पंचशिल नगरातील बुद्धविहारामागे एक उपेक्षित गानसाम्राज्ञी राहते. सुशिलाबाई घुगे हे नाव या वस्तीत फेमस आहे.

गान म्हणणारी बाई ही या वस्तीन सुशिलाबाई घुगे यांना दिलेली ओळख. सुशिलाबाई घुगे यांच्या दहा बाय दहाच्या झोपडीत तब्बल विस जणांचा राबता आहे. चार भांडी, पाचसहा वाकळी चार तपेल्या एक चुल इस्टेट खल्लास. मात्र सुरांची श्रीमंती मोजताच येणार नाही. सुशिलाबाई घुगे यांना लहानपणापासुनच गाण्याची आवड होती मात्र सासरी आल्यानंतर गाण सुटल. तरीही शेतात खुरपतांना गुणगुणणे सुरू होते.

पहाडी आवाज व गाण लक्षात ठेवण्याची अफाट बुध्दिमत्ता पाहून काही सख्यांनी सुशिलाबाईच्या नवर्याला सुशिलाबाईच गाण सुरू ठेवण्याची गळ घातलीच. तेथून पुन्हा सुरांचा प्रवास सुरू झाला. कधी नगर पालिकेच्या स्वच्छता पथकात तर कधी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता रथासोबत बाईने कायम पहीला नंबर राखला. आणि हो या बाईचे शिक्षण ऐकून कोणीही दंग होणार. शाळेचे तोंडही न पाहिलेली ही स्वरसाम्राज्ञी कवी दयानंदाच्या कवनाला फक्त एकदा ऐकते की झाले गाणे चालीसहीत मुखपाठ.

या बाईच्या गाण्याने अनेक स्वराज्य संस्थाना पुरस्कार मिळाले. अनेक गणमान्यांनी सुरांना दादही दिली मात्र दहा बाय दहाच्या झोपडीत आता हे सुर कातर झाले आहेत. कोरोनाने घरातील कर्ती माणसे घरात बसली खाणारी तोंडे दहाबारा या जगण्याच्या लढाईत रोजची सांज पहाडासारखी अंगावर घेत गाणे मात्र अजूनही ओठावर येतेच. या लोककलावंतांची परवड असह्य वेदना देणारी असून उपेक्षित वस्तीत व मागासलेल्या शहरात राहत असल्याने कदाचित ही उपेक्षा वाट्याला आली असावी कदाचित.
(संपादन- विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com