
हराळ येथील शेतकरी भीमराव विक्रम बिल्लारी यांनी उत्पन्न होत नसल्यामुळे व कर्ज झाल्यामुळे, तसेच शासनाकडून अनुदान न मिळाल्यामुळे आपल्या दीड एकरावरील डाळिंबाच्या बागेवर जेसीबी फिरवून बाग नष्ट केली आहे.
रिसोड (जि.वाशीम) : हराळ येथील शेतकरी भीमराव विक्रम बिल्लारी यांनी उत्पन्न होत नसल्यामुळे व कर्ज झाल्यामुळे, तसेच शासनाकडून अनुदान न मिळाल्यामुळे आपल्या दीड एकरावरील डाळिंबाच्या बागेवर जेसीबी फिरवून बाग नष्ट केली आहे.
अल्पभूधारक शेतकरी भीमराव बिल्लारी यांच्याकडे दीड एकर शेती आहे. फळबाग लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर त्यांनी दीड एकरावर गत सहा वर्षांपूर्वी डाळींबाची लागवड केली होती. सुरुवातीला २ वर्ष बऱ्यापैकी उत्पन्न झाले परंतु, मागील चार-पाच वर्षापासून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली त्यातच कर्जाचा डोंगर वाढला.
हेही वाचा -
दीड एकरावर फळबाग असल्यामुळे इतर पिके घेता येत नव्हती व बागेपासून नही काहीच उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे चार वर्षापासून कर्ज वाढतच गेले. शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळते, वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत अनुदानही मिळाले नाही. डाळींब लागवडीपासून तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे बिल्लारी यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत गेली. शेवटी त्यांनी डाळींबाची झाडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला व सहा वर्षापासून तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेली दीड एकरावरील डाळींबाची झाडे जेसीबीच्या साह्याने नष्ट केली.
हेही वाचा - पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत
माझ्याकडे दीड एकर शेती आहे. फळबाग लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल, तसेच शासनाचे अनुदानही मिळेल म्हणून दीड एकरावरही डाळींबाची लागवड केली होती. कृषी विभागात वारंवार चकरा मारूनही अनुदान मिळाले नाही.
-भीमराव बिल्लारी, शेतकरी, हराळा.
अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
0 घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...
0 आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल
0 पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?
0 Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!
0 खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!