esakal | पोहरादेवीत नो एन्ट्री, नियम मोडल्यास होणार कारवाई

बोलून बातमी शोधा

akola washim news No entry in Pohardevi, action will be taken if rules are broken

संपूर्ण देशामध्ये बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे रामनवमीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. रामनवमीला पोहरादेवीत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार असून, पोहरादेवीत कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे.

पोहरादेवीत नो एन्ट्री, नियम मोडल्यास होणार कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशीम : संपूर्ण देशामध्ये बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे रामनवमीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. रामनवमीला पोहरादेवीत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार असून, पोहरादेवीत कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे. पोहरादेवी बरोबरच इतर उत्सवही घरीच साजरे करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून, नियम मोडल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


दरवर्षी पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये संपूर्ण देशातून लाखो बंजारा भाविक संत सेवालाल व माता जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येतात. आठ दिवस लाखो भाविकांची मांदियाळी पोहरादेवीत जमते, मात्र जिल्ह्यामधे कोरोनाने थैमान घातले असताना पोहरादेवी येथील महंतांनी यात्रोत्सव रद्द करून भाविकांनी घरीच उत्सव साजरा करण्यचो आवाहन केले होते.

त्यानुषंगाने जिल्हा पोलिस प्रशासनाकडून पोहरादेवी व इतर सनोत्सवाबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. रामनवमी निमित्त पोहरादेवीत तीन दिवस कोणत्याही नागरिकाला प्रवेश करता येणार नाही. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असल्याने पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीत येणे गुन्हा आहे.

यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने पोहरादेवीच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरून येणारी पोलिस कुमक याबंदोबस्तासाठी वापरण्यात येणार आहे. मुख्य मार्ग, रस्ते सील केल्यानंतर आडमार्गानेही कोणालाही पोहरादेवीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

रामनवमी निमित्त भरणाऱ्या या यात्रेत मोठ्या प्रमाणात बोकड बळी देवून नवस फेडण्याची प्रथा आहे, मात्र यंदा नवसही फेडता येणार नाही. नागरिकांनी घरूनच उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवसेनेचे आमदार आणि तत्कालीन वनमंत्री संजय राठोड बंजारा समाजाचे कुलदैवत असलेल्या पोहरादेवी गडावर गेले. मात्र एकटे गेले नाहीत तर हजारोंची गर्दी घेऊन गेले होते. अशा वेळी प्रशासनाने कोणीतही खबरदारी घेतली नसल्याची भावना भाविकांमध्ये आहो.

(संपादन - विवेक मेतकर)