esakal | गॅस कनेक्शन नाही, कार्ड नाही, तरीही मिळते सबसिडी!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Washim News No gas connection, no card, still get subsidy

गॕस कनेक्शन नाही, कार्ड नाही, परंतु बँकेच्या खात्यात गॕसची सब्सिडी नेहमी जमा होत आहे, असा काहीसा प्रकार उज्ज्वला योजनेचा शिरपूर येथील लाभार्थी असलेल्या एका ग्राहकासोबत घडला आहे. संबंधित ग्राहकाने पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून गॕस एजन्सीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गॅस कनेक्शन नाही, कार्ड नाही, तरीही मिळते सबसिडी!

sakal_logo
By
विवेक मेतकर

शिरपूर (जि.वाशीम) : गॕस कनेक्शन नाही, कार्ड नाही, परंतु बँकेच्या खात्यात गॕसची सब्सिडी नेहमी जमा होत आहे, असा काहीसा प्रकार उज्ज्वला योजनेचा शिरपूर येथील लाभार्थी असलेल्या एका ग्राहकासोबत घडला आहे. संबंधित ग्राहकाने पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून गॕस एजन्सीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक गवळीपूरा या भागात मुन्नीबाई खाजा रेघीवाले नावाची महिला तिच्या कुटुंबासह राहते. या महिलेच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर गॕसचे कनेक्शन नाही. घरात गॕसचे कार्डही नाही. तरी सुद्धा मुन्नीबाई रेघीवाले यांच्या बँकेच्या खात्यात मागील एका वर्षापासून सतत रक्कम जमा होत होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे त्यांनी बँकेत चौकशी केली असता, बँकेच्या खात्यात जमा होणारी रक्कम ही गॕसची सबसिडी असल्याची त्यांना माहिती मिळाली. तक्रारदाराने स्थानिक गॕस एजन्सीकडे उज्ज्वला योजनेसाठी अर्ज केला होता. परंतु गॕस एजन्सी चालकाने मुन्नीबाईंना गॕस कनेक्शन, गॕसचे कार्ड, सिलेंडर, शेगडी व लाईटर इत्यादी कोणतेच साहित्य दिले नव्हते.

परंतु मुन्नीबाईच्या खात्यात गॕसची सबसिडी जमा होत होती, असा हा अजब प्रकार गत एका वर्षापासून संबंधित लाभार्थीसोबत घडत होता. याबाबत एजन्सीकडे माहिती विचारली असता, गॕस एजन्सीकडून सर्व साहित्य लाभार्थीस दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारदाराने सदर भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

तक्रारदाराने जिल्हाधिकारी वाशीम व तहसीलदार मालेगाव यांना देखील तक्रारीची प्रत दिल्याने प्रशासन या प्रकरणी गॕस एजन्सीवर काय कारवाई करते, याकडे सर्व ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
 

loading image