आता आलाय अनोखा ‘स्टेथोस्कोप, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून तपासता येणार रुग्ण

राम चौधरी
Tuesday, 4 August 2020

कोरोना संक्रमणाच्या काळात धास्तीने अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले आहेत. रुग्णांना तपासताना तो कोरोना बाधित असला तर, स्वतःलाही कोरोनाची बाधा होईल, ही भीती या मागे आहे. मात्र, आता वाशीम येथील शासकिय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त चार्जमन तथा विद्युत अभियंता सत्यनारायण भड यांनी तब्बल दहा फुटावरून रुग्णाला तपासता येईल, असा स्टेथोस्कोप तयार केला आहे. वाशीममध्ये काही दवाखान्यांमध्ये याचा वापर सुरू झाला आहे.

वाशीम  ः कोरोना संक्रमणाच्या काळात धास्तीने अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले आहेत. रुग्णांना तपासताना तो कोरोना बाधित असला तर, स्वतःलाही कोरोनाची बाधा होईल, ही भीती या मागे आहे. मात्र, आता वाशीम येथील शासकिय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त चार्जमन तथा विद्युत अभियंता सत्यनारायण भड यांनी तब्बल दहा फुटावरून रुग्णाला तपासता येईल, असा स्टेथोस्कोप तयार केला आहे. वाशीममध्ये काही दवाखान्यांमध्ये याचा वापर सुरू झाला आहे.

कोरोना संक्रमण प्रत्येक शहरात वेगाने वाढत आहे. यामध्ये खासगी डॉक्टरांकडून कोरोनाच्या धास्तीने दवाखाने बंद करण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. रुग्णांना तपासताना स्टेथोस्कोप रूग्णाच्या छातीला लावून तपासावे लागते. यामध्ये सामाजिक दुरावा राहत नसल्याने डॉक्टरांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता बळावते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ही बाब लक्षात घेवून वाशीम येथील शासकिय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त चार्जमन तथा विद्युत अभियंता सत्यनारायण भड यांनी शहरातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एका अनोखा स्टेथोस्कोप तयार केला आहे. या स्टेथोस्कोपचा वापर करून डॉक्टर १० फुट अंतरावरून सुध्दा रुग्णाला तपासू शकतात. हा स्टेथोस्कोप तीन मोडमध्ये वापरता येतो. वायर्ड मोड, ब्ल्युट्यूथ मोड व मोबाईल मोडनेसुध्दा हा स्टेथोस्कोप संचालित करता येतो.
 
स्टेथोस्कोप असा झाला तयार!
सत्यनारायण भड यांनी वाशीम येथील प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अरूण बिबेकर यांच्या मार्गदर्शनात तयार केला आहे. हे उपकरण तयार करताना स्टेथोस्कोप सारखे हेडफोन जोडण्यात आले आहेत. समोर वायरच्या माध्यमातून विद्युत लहरीव्दारे मुख्य स्टेथोस्कोपला जोडण्यात आले आहेत. यामध्ये हृदयमोड व फुफूसमोड असे दोन पर्याय आहेत. यासाठी या उपकरणाला दोन बटण आहेत. जे बटण दाबले त्या अवयवांची स्पंदने वायरच्या दुसऱ्या टोकाला डॉक्टरांच्या कानात बसविलेल्या स्टेथोस्कोपमधून ऐकू येतात. हे उपकरण होमथिएटर सिस्टमला सुध्दा जोडता येते. त्यामुळे स्पंदनाचा आवाज ऐकता येतो. हा स्टेथोस्कोप सत्यनारायण भड यांनी केवळ १५ दिवसात तयार केला आहे.
 
असा होतो वापर
दवाखान्यामध्ये रुग्ण आल्यानंतर त्याला तपासणी कक्षात दाखल केल्याबरोबर वायरला जोडलेल्या समोरचा स्टेथोस्कोप रुग्णाच्या छातीवर ठेवला जातो. त्यानंतर हे उपकरण सुरू केल्यानंतर दहा फुटावर उभे राहून हृदय व फुफूसाची स्पंदने मोजता येतात. सध्या हा स्टेथोस्कोप बिबेकर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तत्वावर वापरल्या जात आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola washim news Now comes the unique stethoscope, the patient can be examined by observing social distance