esakal | जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Washim Political News akola District Bank Election; Voter unknown; Candidacy entanglement remains

जिल्हा बँकेत सहा उमेदवार उभे आहेत, त्यामधून आता किती उमेदवार रिंगणात राहतात याकडे लक्ष लागले आहे. विधमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधमान संचालक उमेश ठाकरे यांची उमेदवारी जाहीर केली, तर माजी मंत्री सुभाष ठाकरे हे कोणाला उमेदवारी देणार ? याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

sakal_logo
By
संजय अलदर

मानोरा (जि.वाशीम) : दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या ता.२० फेब्रुवारीला होत आहे. त्याकरिता इच्छुक उमेदवार फिल्डिंग लावत आहेत, तसेच मतदारांनी आपल्याच मतदान दिले पाहिजे याकरिता मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू आहे.

जिल्हा बँकेत सहा उमेदवार उभे आहेत, त्यामधून आता किती उमेदवार रिंगणात राहतात याकडे लक्ष लागले आहे. विधमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधमान संचालक उमेश ठाकरे यांची उमेदवारी जाहीर केली, तर माजी मंत्री सुभाष ठाकरे हे कोणाला उमेदवारी देणार ? याकडे लक्ष लागले आहे.


विधानसभा निवडणुकीत माजी आमदार व सुभाष ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढविली आता, मात्र हे दोन नेते एकत्र येऊन उमेदवारी कोणाला देतात हे अध्यपही गुलदस्त्यात आहे. जिल्ह्या बँकेत सहा उमेदवार आहेत, त्यातील पाच उमेदवार मराठा समाजाचे असून, एक अल्पसंख्याक उमेदवार असल्याने अल्पसंख्याक उमेदवारला उमेदवारी पसंती देतील का ? दिल्यास जिल्हा बँकेचे चित्र वेगळे पहावयास मिळेल, तर आ. राजेंद्र पाटणी कडून विधमान संचालक उमेश ठाकरे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावून मतदार अज्ञात ठिकाणी रवाना झाले आहेत.

त्यामुळे जिल्हा बँकेच्या मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा नेते अरविंद इंगोले यांचे चिरंजीव तुषार पाटील आपली शेवटची ताकद दाखवून शेवटची लढाई लढण्याची शर्थ केली आहे. माजी संचालक सुरेश गावंडे हे माजी आमदार प्रकाश डहाके यांचे विश्वासू असल्याने त्यांच्या नावावर शेवटी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा या राजकीय घडामोडीत तालुक्यातील ३४ मतदारात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांनी अद्यापही आपले पत्ते खुले केले नाहीत, मात्र त्याची पसंती वेगळीच असू शकते अशा राजकीय घडामोडीत ही निवडणूक अटीतटीच्या प्रसंगात दोन्ही नेत्याचे एकमत झाल्यास ही निवडणूक प्रतिष्ठेची होईल. विद्यमान आमदार व दोन माजी आमदार आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत, असे असताना जिल्हा बँकेवर कोण संचालक होइल हे मात्र काळच सांगू शकतो.

अज्ञात स्थळी जाणारे मतदार कोणाचे?
जिल्हा बँकेची निवडणूक जोरात सुरू झाली आहे. त्यामध्ये अर्ज मागे घेण्याची तारीख १० आहे. निवडणूक तारीख २० फेब्रुवारीला मतदान होणार असून, आताच मतदार अज्ञात ठिकाणी जाऊन बसले आहेत. हे मतदार कोणाचे हे दोन्ही गट दावा करीत आहेत.


जोडतोडीला आला जोर
या निडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद इंगोले यांचे चिरंजीव तुषार पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील बदललेले राजकीय चित्र पाहता, माजी आमदार सुभाष ठाकरे व प्रकाश डहाके यांनी ताकद लावली, तर तुषार पाटील यांची उमेदवारी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top