

Akola News
esakal
अकोला: शहरात पाणीटंचाईची झळ अकोलेकरांना प्रकर्षाने जाणवू लागली आहे. शहरातील उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चारही झोनमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याचे चित्र असून, यामागे केवळ कमी जलसाठा कारणीभूत आहे का, की व्यवस्थेतील त्रुटी आणि नियोजनाचा अभाव आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.