esakal | अकोला विदर्भात ‘हॉट’, आठवडाभरात उष्णतेची लाट; पारा जाणार ४५ अंशसेल्सिअस पार
sakal

बोलून बातमी शोधा

akola weather news Heat waves throughout the week; The temperature will cross 45 degrees Celsius

जिल्ह्यात सध्या तापमान वाढत असून, बुधवारी विदर्भात सर्वाधिक ४२.९ अंशसेल्सिअसची नोंद अकोल्यात झाली. यापुढे जिल्ह्यात तापमानाचा आलेख चढत जाणार असून, आठवडाभरात उष्णतेची लाट अकोलेकरांना अनुभवायला येऊ शकते.

अकोला विदर्भात ‘हॉट’, आठवडाभरात उष्णतेची लाट; पारा जाणार ४५ अंशसेल्सिअस पार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः जिल्ह्यात सध्या तापमान वाढत असून, बुधवारी विदर्भात सर्वाधिक ४२.९ अंशसेल्सिअसची नोंद अकोल्यात झाली. यापुढे जिल्ह्यात तापमानाचा आलेख चढत जाणार असून, आठवडाभरात उष्णतेची लाट अकोलेकरांना अनुभवायला येऊ शकते.

जगातील उष्ण शहरांमध्ये आता अकोल्याची गणती होत असून, गेल्या दोन वर्षांत जागातील सर्वोष्ण शहराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा अकोला जिल्ह्याची नोंद झाली होती. जिल्ह्यात दिवसेंदिवस व दरवर्षी उष्णतेचा आलेख वाढतच असून, त्यासाठी विविध कारणे तज्ज्ञांकडून दिली जातात.

मात्र, वाढते प्रदूषण आणि वृक्षतोड ही दोन मुख्य कारणे सर्वश्रूत आहेत. कोविड-१९ चा प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गेल्यावर्षी भारतासह जगामध्ये विविध देशात लॉकडाउन करण्यात आल्याने जागतिक प्रदूषणात बऱ्यापैकी घट झाली होती. परंतु, २०२० मध्ये पुन्हा प्रदूषणात वाढ झाली आहे.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात

त्यामुळे यावर्षी तापमानाचा जोर कितपत राहील हे सांगता येणे कठीण आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, सध्या अकोल्यासह विदर्भात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. बुधवारी (ता.७) सुद्धा विदर्भामध्ये सर्वाधिक अकोल्यात ४२.९ अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, आठवडाभरात तापमानाचा आलेख वाढून उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

विदर्भात प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात दरवर्षी तापमान अधिक राहाते. सध्याही विदर्भात सरासरी तापमान ४१ अंशसेल्सिअसहून अधिक आहे. पुढील दिवसात त्यामध्ये वाढ होणार आहे. आठडाभरात उष्णतेची लाट विदर्भात जाणवू शकते. सध्या पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर
(संपादन - विवेक मेतकर)

loading image