बाजारातून युरीया गेला तरी कुठे?, ऐन हंगामात शेतकऱ्यांसमोर नवे संकट

धीरज बजाज
Thursday, 9 July 2020

जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या आटोपल्या आहे. त्यामुळे आता शेतकरी पिकांच्या मशागतीकडे लक्ष देत आहेत. पीक वाढीसाठी शेतकरी कपाशीसह अनेक पिकांच्या वाढीसाठी आणि उपोषणासाठी यूरिया खताचा वापर करतात. परंतु सध्याच्या स्थितीत बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे.

हिवरखेड (जि.अकोला)  ः जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या आटोपल्या आहे. त्यामुळे आता शेतकरी पिकांच्या मशागतीकडे लक्ष देत आहेत. पीक वाढीसाठी शेतकरी कपाशीसह अनेक पिकांच्या वाढीसाठी आणि उपोषणासाठी यूरिया खताचा वापर करतात. परंतु सध्याच्या स्थितीत बाजारपेठेत युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे.

अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकरी यूरिया खताची मागणी करत आहेत. गत काही दिवसांपासून बाजारपेठेतून यूरिया अचानक गायब कसा झाला, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामध्ये यूरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात वाढीव दराने यूरिया विकण्याचा फंडा तर वापरला जात नाही ना? अशी शंका सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात घर करत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोणत्याही शेतकऱ्याला दुकानदार यूरिया खत देत नसेल किंवा त्यासोबत अनावश्‍यक वस्तु खरेदी करण्याची सक्ती करत असेल तर आम्हाला माहिती द्यावी. यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.
- मिलींद वानखेडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

माझ्या कपाशी पिकाला यूरियाची नितांत आवश्‍यकता आहे. परंतु कोणत्याच कृषी केंद्रावर यूरिया मिळाला नाही. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना यूरिया उपलब्ध करून द्यावा.
- आशीष गुप्ता, शेतकरी, हिवरखेड

मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. दहा गाडींची ऑर्डर दिल्यास एक गाडीच युरिया मिळतो.
- सुनील राठी, कृषी केंद्र चालक हिवरखेड

 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Where did the urea go from the market ?, a new crisis for farmers in the Ain season