आता सरळ पोलिसच करू शकतील गुटख्यावर कारवाई, अन्न व औषध विभागाने मागणी केल्यास मिळणार पोलिस बंदोबस्त

भगवान वानखेडे
Wednesday, 22 July 2020

प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर याआधी पोलिस विभागाला अन्न व औषध विभागाची मदत घ्यावी लागत असे. मात्र, आता पोलिस विभागाला प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसे आदेश निर्गमीत करण्यात आले असून, अद्याप मात्र, अकोला पोलिस विभागाला तसे आदेश मिळाले नसल्याची माहिती आहे.

अकोला  ः प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर याआधी पोलिस विभागाला अन्न व औषध विभागाची मदत घ्यावी लागत असे. मात्र, आता पोलिस विभागाला प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसे आदेश निर्गमीत करण्यात आले असून, अद्याप मात्र, अकोला पोलिस विभागाला तसे आदेश मिळाले नसल्याची माहिती आहे.

आता गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खर्रा, मावा या प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी व कारवाईत येणाऱ्या अडचणींच्या निराकरणा संदर्भात 5 फेब्रुवारी 2020 रोजी बैठक आयोजित करून उपमुख्यमंत्री यांनी भादवि कलम 188, 272, 273 व 328 या कलमांतर्गंत पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसा मेल 16 जुलै रोजी राज्यभरातील पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात आला आहे. तर अकोला पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत सांगितले की, सदर मेल 16 जुलैचा असून, मात्र, अद्याप कागदोपत्री कळविण्यात आले नाही.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अन्न व औषध विभागाला मिळणार पोलिस बंदोबस्त
ज्या ठिकाणी अन्न व औषध विभागाला प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करायची आहे. मात्र, तेथे काही अनुचित प्रकार घटू शकते असे वाटल्यास विभागाने पोलिस विभागाला मदत मागितल्यास त्यांना पोलिस बंदोबस्त मिळू शकतो असेही विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola will now be able to take action on gutkha directly, police will get police cover if demanded by the Food and Drug Administration