

Akola News
esakal
अकोला: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले असून, शुक्रवारी (ता.२४) पत्रकार परिषदेत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या घटना दुरुस्ती विधेयकावर तीव्र टीका केली. या विधेयकाच्या माध्यमातून मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा घाट घातल्या जात होता, असा आरोप त्यांनी केला.