अरे हे काय ? कंटेन्मेंट झोनमधील मजूर एमआयडीसीत; इतर मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

सिद्धार्थ वाहुरवाघ
बुधवार, 3 जून 2020

परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी परतल्यानंतर एमआयडीसी मधील अनेक कंपन्यांना पूर्व पदावर आणण्यासाठी मजुरांची आवश्‍यकता आहे. काही आधीचे आणि काही इतर मजुरांना कामावर घेऊन दाळ मिल, ऑइल मिल इतर कंपन्या चालू करण्याची प्रक्रिया चालू आहे. अशातच आधी कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणचे नागरिक देखील काही मिलांमध्ये कामासाठी येताना दिसत आहे.

अकोला : शहरात पाहता-पाहता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 600 च्यावर गेली असली तरी, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दीडशेच्या आसपास आहे. त्यानुसार कंटेन्मेंट झोनची संख्येनेही शंभरी गाठली आहे. प्रशासनाकडून काही प्रमाणात कमी करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमधील नागरिक उदनिर्वाहासाठी एमआयडीसी परिसरात कामांनिमित्त घराबाहेर पडत आहेत. परंतु, ज्या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. अशा ठिकाणच्या मजुरांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा- मुंबईतून निसर्ग वादळ जात नाही तोच दुसरं मोठं राजकीय वादळ

स्थानिक पत्ता ठेवत आहेत गुपीत
परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी परतल्यानंतर एमआयडीसी मधील अनेक कंपन्यांना पूर्व पदावर आणण्यासाठी मजुरांची आवश्‍यकता आहे. काही आधीचे आणि काही इतर मजुरांना कामावर घेऊन दाळ मिल, ऑइल मिल इतर कंपन्या चालू करण्याची प्रक्रिया चालू आहे. अशातच आधी कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणचे नागरिक देखील काही मिलांमध्ये कामासाठी येताना दिसत आहे. आपण कंटेन्मेंट झोन मधील किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील असल्याने आपल्याला कामावर घेतील की, नाही याची भीतीही त्यांना आहे. परंतु, कोणालाही स्थानिक पत्ता न सांगता मजूर एमआयडीसीत दाखल होत आहेत.

इतर मजुरांना आधीपासून माहीत असल्यामुळे परंतु, त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याने तेही अशा मजुरांबद्दल कोणाला काहीही सांगत नाही आहेत. पण, अशा मजुरांपासून आपल्याला कोरोना होणार नाहीना याचीही भीती त्यांच्या मनात आहे. दहा-बारा तास काम त्यांच्यासोबत करावे लागत आहे. अशावेळी कंपनी मालकांसह प्रशासनानेही याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. एमआयडीसी परिसरात एखादा पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यास इतर कंपनींना त्याचा फटका बसणार असल्याची भीतीही नाकारता येत नाही.

क्लिक करा- शेतकऱ्यांची अशीही अवस्था; उपाशीपोटी ताटकळत बसले तरी रिकाम्या हाताने परतले

कंपनी मालकांनी घ्यावी दक्षता
कंटेन्मेंट झोनमधील नागरिक कामांनिमित्त एमआयडीसी परिसरात येत आहेत. अशावेळी कोणता मजूर कसा आहे, कोणाला कोरोनाची लागत तर नाही ना, काम करतानी मजुरांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची अमलबजावणी करणे, सॅनिटायझरची व्यवस्था करणे, मास्क, रुमाल, दुपट्टा वापरणे, आठवड्यातून एकदा आरोग्य मजुरांची आरोग्य तपासणी करणे, सतत हात धुण्यापासून त त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर बारिक लक्ष देण्याची गरज सदर कंपनी मालकांची आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनावर मात करण्यास मदत होणार आणि बेरोजगाराला रोजगारही मिळणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Workers in restricted areas from MIDC