Akola
AkolaSakal

Akola: एका मिनिटात १२१ हुला हूप स्पिनचा (घेर नृत्य) बनविला विश्‍वविक्रम

१३ जुलै २०२३ रोजी चित्राक्षी आनंदानी हिने ही कामगिरी करून इतिहास रचला आहे.
Published on

अकोला - अकोल्याच्या चित्राक्षी हेमंत आनंदानी  या तीन वर्षीय चिमुकलीने केवळ एका मिनिटात सर्वाधिक ‘हुला हुप स्पिन’चे (घेर नृत्य) प्रदर्शन करून विश्व रेकाॅर्ड बनवून इतिहास रचला आहे. केवळ तीन वर्ष तीन महिने आणि १८ दिवस वय असलेल्या चित्राक्षीने एक मिनिटात १२१ हुला हूप स्पिनचा विश्व विक्रम  स्थापित केला  आहे.

१३ जुलै २०२३ रोजी चित्राक्षी आनंदानी हिने ही कामगिरी करून इतिहास रचला आहे.  इतक्या कमी वयात चित्राक्षीचा  उत्साह, शारीरिक स्फूर्ती आणि डोळ्याची चमक पाहून भले मोठे प्रभावित झाल्याशिवाय राहू शकत नाही.

Akola
Mumbai Local Mega Block : रविवारी मेगाब्लॉक, मुंबईकरांनो टेन्शन नॉट, कधी कुठे कसा सगळं एका क्लिकवर ...!

चित्राश्रीने तिच्या कामगिरीद्वारे  सिद्ध केले आहे की, जीवनात कोणतेही बंधन नसते. लक्ष्य प्राप्तीची जिद्द, अथक परिश्रम व समर्पण भावनेने यशाचे शिखर गाठता येते, याचे जिवंत उदाहरण चित्राक्षीने प्रस्तूत केले आहे.

ज्या वयात लहान मुलं स्वतःच्या पायावर उभे देखील राहू शकत नाही. अशा लहान वयात चित्राक्षीने हुला हूप स्पिन मध्ये विश्व किर्तीमान रचला आहे. चित्राक्षी ही नवरंग कथक कला केंद्रात  डान्स शिकते. अकोल्यातील आनंदानी  परिवाराची ही चिमुकली माऊंट कारमेलमध्ये  नर्सरीची विद्यार्थीनी आहे. तिच्या कामगिरीमुळे अकोलाचे नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाले असून, तिचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत  आहे.

Akola
Mumbai Trans Harbour : तुर्भे स्थानकात तांत्रिक बिघाड : ट्रान्सहार्बर प्रवाशांचे झाले हाल!

माउंट कार्मेल इंटरनॅशनल स्कुलची विद्यार्थिनी चित्राक्षी हेमंत आनंदानी हिने ‘हुला हूप’ या खेळामध्ये अगदी लहान वयात घडवून आणलेला जागतिक विक्रम हा केवळ शाळेसाठीच नव्हे तर, संपूर्ण समाजासाठी एक आदर्श आहे.

चित्राक्षीने तिच्या कर्तृत्वाद्वारे माउंट कार्मेल इंटरनॅशनल स्कुलची कीर्ती वाढवली आहे. शाळेला तिच्या कर्तुत्वाचा अभिमान आहे. सोबतच मुलींना प्रोत्साहन देऊन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आई-वडिलांचा देखील आम्हाला अभिमान आहे. भावी आयुष्यासाठी तिला प्रार्थनामय शुभेच्छा.

- फादर रुपेश अँड्र्यू डाबरे, मुख्याध्यापक, माउंट कार्मेल इंटरनॅशनल स्कूल, अकोला

चित्राक्षी ही आमच्या परिवारात जन्मलेली अत्यंत तेजस्वी बालिका आहे. एवढ्या लहान वयात तिने संपूर्ण परिवाराचा नावलौकिक वाढविला असून, भविष्यात देखील ती यशाचे शिखर गाठेल असा आम्हाला विश्वास आहे.

- हेमंत आनंदानी, चित्राक्षीचे वडिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com